Thursday, July 29, 2010

कर निश्चय मनाशी आता...

कर निश्चय मनाशी आता...

आला हा सूर्य घेउनी एक नवीन पहाट
नव्या दिशेने करायची वाटचाल तुला आज ...

जा तू विसरुनी भूतकाळ सारा,
नव्या संधीचा गंध गुजतोय आसमांत सारा..

सोड त्या चुका भूतकाळात ज्या केल्या,
आयुष्य सुंदर हे जगायला का तू विसरला...

खंबीर असे मन तुझे नको डगमगू तू देऊस,
काळजीत आहेत जे तुझ्या,नको आज तू दुरावूस..

आहे खूप सार्या गोष्टी आयुष्यात या अनुभवायला,
अन एका वादळातच का लागली नौका बुडायला ..

आहे पंखात बळ तुझ्या, घे तू उंच भरारी ,
टाक हवेला भेदुनी त्या , गुंजू दे तुझी डरकाळी ..

करीन स्वप्न पूर्ण सारी,निश्चय मनाशी आज कर,
राहा पुन्हा उभा हिमतीने,लढायला स्वताला तयार कर..

पहिले आहेत स्वप्नं, तुझ्या घरच्यांनी खूप सारी,
आज त्या स्वप्नपुर्तीन्साठी कर आयुष्याला सुरुवात खरी...

आहे तो देव आज तुझ्या पाठीशी उभा,
सदैव तू जिंकत राहावे, कर निश्चय मनाशी आता...कर निश्चय मनाशी आता...

हृदय ते चिरते...

हृदय ते चिरते...

होतो उभा त्या दारापाशी
हताश अन मनी विचारांच्या गाठी..
नव्हते माहिती मनाला माझ्या आज ..
येशील का ग प्रिये तू माझ्यासाठी..

मिनिटांचे तास ते बघता बघता झाले..
उभ्या उभ्या आठ तास मी घालवले..
होते केले प्रेम कोणी एके काळी..
त्याच प्रेमाने संकट आज ते ओढावले...

कशी हि दुनिया अशी स्वार्थी झाली..
धोक्याची ती गोळी मजवर झाडली
प्रेमाचे रूप ते तू न ओळखले,
छळाचे कारण देऊनी मज आज हटविले..

शेवटचे आज पाहायचे होते तुला,
भेटुनी तुज आज काही होते सांगायचे मला
भेटायची संधी ती मज न मिळाली,
माझ्या या प्रेमाची गुन्ह्यात दाखल झाली..

निस्वार्थी प्रेमाची हीच शिक्षा असते,
सदा अश्रू ढाळणे हेच नशिबी असते,
प्रेमभंग हि यातना असा धक्का देते,
सांडूनी रक्त सारे हृदय ते चिरते...हृदय ते चिरते...

कविता मला सुचत नाही..


कविता मला सुचत नाही..

वाहिलेले शब्द ते मला वेचता येत नाही...
प्रेमावर लिहायला कविता मला सुचत नाही..

प्रेमाचे ते बोल मला समजत नाही...
प्रेमावर लिहायला कविता मला सुचत नाही..

असते ओढ कशी तुला ती जाणवत नाही..
प्रेमावर लिहायला कविता मला सुचत नाही..

आठवणीचा खेळ तो मी विसरत नाही..
प्रेमावर लिहायला कविता मला सुचत नाही..

वाहिलेल्या अश्रूंचा हिशोब तो लागत नाही..
प्रेमावर लिहायला कविता मला सुचत नाही..

जगलेल्या रात्रींचे गणित ते लागत नाही...
प्रेमावर लिहायला कविता मला सुचत नाही..

वाट पाहिलेल्या तासांची आकडेमोड सुटत नाही..
प्रेमावर लिहायला कविता मला सुचत नाही..

तुटलेल्या प्रेमाचे प्रतिक ते जुळत नाही..
प्रेमावर लिहायला कविता मला सुचत नाही..

तुझ्यात अडकलेली वेळ ती पुढे सलत नाही..
प्रेमावर लिहायला कविता मला सुचत नाही..

तुझ्या हास्याची कोर चंद्रावरही दिसत नाही..
प्रेमावर लिहायला कविता मला सुचत नाही..

पावसातल्या सरींमध्ये अश्रू माझे लपत नाही..
प्रेमावर लिहायला कविता मला सुचत नाही..कविता मला सुचत नाही...