Saturday, August 14, 2010

बहुतेक मी सर्वांचा लाडका ....


बहुतेक मी सर्वांचा लाडका
कुणाचाही नावडता नाही
पण जी माझी सर्वात लाडकी
तिचाच मी आवडता नाही.

तुझ्यासोबत सजवलेले स्वप्नांचे घर
मी कधीही तोडणार नाही
तू ये किंवा नको येवुस
तुझी वाट पाहन सोडणार नाही.

तुझ्या साठी बघ मी
किती मोठ्ठं मन केलं
तुला आवडतं खेळायला, म्हणून
हृदयाचं खेळणं केलं

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●


वाटल नव्हत मला, अस काही घडेल |
आपल्या मैत्रीचा वृक्ष, असा कोलमडून पडेल ||

याच मैत्रीला कधी काळी, मधाचा गोडवा होता |
त्या दिवसात रोज, दिवाळी पाडवा होता ||

जेव्हा रडत होतो, तेव्हा मैत्रीनेच हसवलं |
नुकताच हसायला शिकलो, आणि पुन्हा मैत्रीनेच रडवलं ||

चूक तुझीही नसावी, किंवा माझीही नसावी |
काय सांगाव आपल्या, दैवातच खोट असावी ||

कारणा शिवाय दुरावलो, याचाच वाईट वाटत |
रडून रडून शेवटी, डोळ्यातलं पाणी आटत ||

विसरून सार दुख, मी मनाला हव आवरायला |
तू परतणार असशील तर, मी तयार आहे सावरायला ||

तू परते पर्यंत मी, तुझीच वाट पाहीन |
आत्ताच काय ? अजन्म तुझाच मित्र राहीन ||

जपून पावल टाकत जा, चुकूनही घसरू नकोस |
आठवण नाही काढलीस, तरी मला विसरू नकोस ||

वाटल नव्हत खरच, अस कधी घडेल |
आपल्या मैत्रीचा वृक्ष, असा कोलमडून पडेल ||

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

आज वाटलं की अश्रूंच्या शाईनेच कविता लिहावी
तसेही डोळ्यातून ते आज काल आटता-आटत नाही
हे ऐकून अश्रूही आज बोलले
म्हणाले, मनात घुसमट होते म्हणून बाहेर येतो
तर आता तुला तेही पटत नाही

काही नाती तुटत नाहित
ती आपल्या नकळत मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेउन
फुलपाखरे हातातून सुटत जातात

तुला डोले भरून पहायचे असते पण
तू आलास की डोळेच भरून येतात
आणि बोलायाचे म्हटले तर
मुकेपन धरून येतात
..