Thursday, December 9, 2010

"पुणेरी " संस्कृतीचे आक्रमण "मॅकडोनाल्डसवर" झाले तर ?
  1. आमचे येथे बर्गर  मिळतील.   तसेच बाहेरील खाद्य पदार्थांस एक रुपयात सॉस लावून मिळेल. पण ते इथे खाता येणार नाहीत. 
  2. ह्या ब्रांचचे मालक इथेच जेवतात (टीप: मालकांच्या वजनाची चौकशी करू नये)
  3. दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील. नंतर ज्यादा आकार पडेल.
  4. कारणाशिवाय बसू नये.   कारण काढूनही बसू नये.   फक्त खाण्यासाठीच  बसायची सोय आहे.
  5. टि.व्ही. चालू ठेवायचा किंवा नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे.   तरी बंद टिव्हीचा आरशासारखा उपयोग करून केस वगैरे विंचरू नयेत.
  6. टि.व्ही. चालू असेल तरी फार पहात बसू नये.   हे खाद्यगृह आहे प्रेक्षागृह नव्हे.
  7. कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावेत. नंतर तक्रार चालणार नाही. (लहान साईज: ४६  फ्राईज, मध्यम : २७  फ्राईज, मोठा: १७  फ्राईज)
  8. गि-हाईकांचा संतोष हेच आमचे ध्येय. (व्यवसायाच्या वेळा : ११ ते १ व ४ ते ८ /  तक्रारीची वेळ : ११ ते ११.०५)
  9. पहिल्या दहा मिंटात ऑर्डर मिळाली नाही तर पुढच्या दहा मिंटात मिळेल.   पैसे परत मिळणार नाहीत.
  10. कृपया ड्राईव थ्रू च्या खिडकीवरील मुलीशी गप्पा मारू नयेत.
  11. विनाकारण सॉस मागू नये.   टोमाटो फुकट मिळत  नाहीत.
  12. शीतपेयाच्या ग्लासच्या झाकणास भोक पडलेले नाही तर चोखनळी (स्ट्रॉ) साठी पाडलेले आहे.   ते बदलून मिळणार नाही ह्याची नोंद घ्यावी.
  13. दुस-या कंपनीच्या बरगरच्या किमती इथे सांगू नयेत.
  14. उरलेले अन्न नेण्यास घरून डबा आणावा.   कागदी वा प्लास्टिक पिशवी मिळणार नाही.
  15. हॅपी मिलची खेळणी संपलेली आहेत (ही पाटी कायमची का आहे ते विचारू नये)
  16. आमची कुठेही शाखा आहे !  (पण दुस-या शाखेच्या तक्रारी इथे सांगू नयेत)
  17. कृपया बाहेरील आमच्या जोकरच्या पुतळ्याशी फार लगट करू नये.   सभ्यपणे फोटो काढावेत.
  18. शीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा.   चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये.
                                                                                                                       -   हुकूमावरून 
मैत्रीच्या पावसात
काल म्हटलं पावसाला,
माफ कर बाबा,
आज भिजायला जमणार नाही.

मैत्रीच्या पावसात भिजून
झालोय ओलाचिंब.

न्हा‌ऊ घालतोय बघ मला
शुभेच्छांचा प्रत्येक थेंब

मित्रांची इतकी गर्दी झालीय
भिजून भिजून बघ मला सर्दी झालीय

पा‌ऊस रिमझिम हसला.
ढगांना घे‌उन क्षितीजावर जाउन बसला.

जाता जाता म्हणाला,
“काळजी नको. भिजून घे खूप.
भिजणं थांबलं की घे पुन्हा मैत्रीचीच ऊब …!
हे लग्न झालेल्यांनी, न झालेल्यांनी आणि लग्न होणार असलेल्यांनी ...... नक्कीच वाचा: विचार करा.

एका रात्री मी घरी आलो ते  मनाशी काही ठरवूनच. जेवताना मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, "मला तुझ्याशी काही बोलायचं आहे." तिच्या    डोळ्यांत वेदना उमटली; तरीही ती शांतपणे जेवत होती, सगळे शब्द जुळवून मी तीअल सांगितलं, मला घटस्पोट हवाय." तिने शांतपणे विचारल,- "का?"  तिचा प्रश्न मी टाळला, ती भडकली. समोरच ताट तिने भिरकावून दिलं. लग्न मोडायला नेमकं काय आहे, हे तिल जानुन घ्ययच होत; पान माज़् मन दुसर्य स्त्रीवर आलय हे मि तिल स्पष्टपणे सांगू  शकत नव्ह्तो. माझा बँक बलाचे, कार, घर, सगळ मी तिला देऊ केलं: पण मी समोर केलेल्या घटस्पोटाच्या कागदाचे तिने तुकडे केले.
 
दुसऱ्या दिवसी तिने माझ्यासमोर घटस्पोटा विषयीच्या अटीचा कागद समोर केला. तिला माझ्याकडून काहीही नको होते, फक्त एक महिन्याची नोटीस हवी होती आणि या एक महिन्यात दोघांनीही नॉर्मल रहावं अशी तिची इश्च्या होती. तिची
कारणे साधी होती. महिन्या भरात   आमच्या मुलाची परीक्ष्या होती आणि त्याच्यावर काहीही परिणाम व्हायला नको होता. तिची आणखी एक अट होती. लग्नाच्या दिवसी मी तिला बेडरूम पर्यंत कसं उचलून नेलं होत. त्याप्रमाणे रोज महिनाभर तिला न्यायचं होत तशी तिची अटच होती. मला वाटलं तिला वेड  लागलंय; पण महिना व्यवस्थित जावा यासाठी मी तिची अट मान्य केली. घटस्पोटाच्या विचारामुळे अनेक दिवस माझा पत्नीसोबतचा संपर्कच झालेला नव्हता. त्यामुळे पहिल्या दिवसी बेडरूम पर्यंत तिला नेताना आम्ही दोघही फार अवघडून गेलो.  मी तिचा हात धरून बेडरूम पर्यंत नेतान माझ्या मुलाने बघितलं आणि त्याला फार आनंद झाला. दुसया दिवसी ती माझ्या छातीला टेकून होती. आपण आपल्या बायकोकडे बरेच दिवस निट बघितलेच नाही हे मला जाणवलं; आणि तिचा सहवास मला अचानक हवाहवासा वाटू लागला. आपण हिच्या बाबतीत असा अचानक निर्णय का घेतोय असा प्रश्न पडला. त्यानंतरच्या प्रत्येक दिवसी तिला उचलून किंवा सोबन बेडरूम पर्यंत नेताना आमच्यातली एक हवीहवीशी जवळीक वाढत असल्याचं मला जाणवलं. रोजच्या प्रमाणे तिला अचानक उचलताना मला जाणवलं तीच वजन कमी झालंय. हृदयातल्या वेदनाचां हा परिणाम होता. मी आस्थेने तिच्या कपाळाला स्पर्श केला. दिवसागणिक तीच कमी होणारं वजन माझी काळजी वाढवत होत.  पण तिच्या अटीच पालन करताना मला आंतरिक समाधान मिळत होत, आमच्यात काय घडतंय  याची कल्पना नसतानाही आमचा मुलगा खूप खुश होता.
आमच्यात दुरावा निर्माण झाला होता कारण आमच्यातली जवलीकच संपली होती. जी परत आयुष्यात येत होती.
महिन्याच्या शेवटच्या दिवसी - मी मनाशी निर्णय घेतला.  माझ्या प्रेयसीच्या घरी आलो आणि मी माझ्या पत्नीला घटस्पोट देऊ शकत नसल्याच स्पष्टपणे सांगितले.  ती चिडली, संतापली, पण आता मला काही यैकायाच नव्हते.  माझ्या प्रिय पत्नीचा हात मला आता मरे पर्यंत सोडायचा नव्हता. मी वेगाने CAR चालवत घरी आलो.  माझ्या चेहऱ्यावर हसू होत. हातात फुलांचा गुष्य होता. मी बेडरूम मध्ये पोहचलो, तर माझी प्रिय पत्नी बेडवर निष्प्राण पडलेले होती. मुलाला जवळ घेऊन मी अनावर रडत सुटलो. माझ्या प्रेमापायी तिने जीव दिला होता. ती असताना मी जे करायला हव ते केल नाही. जे प्रेम , जी जवळीक तिला हवी होती ती मी तिला दिली नाही. आता माझे अश्रू तिला परत आणू शकत नव्हते. पती-पत्नीच्या नात्यात कार , बंगला , प्रेयसी, पैसा काहीही महत्वाच नाही. महत्वाच आहे ते प्रेम, जवळीक आणि विश्वास. वाचा आणि विचार करा. स्वताला विचार--- " आपल वैवाहिक आयुष्य खरच सुखाचं आहे?"
 
या कहाणीचा एकच संदेश आहे.---
 
" जे आहे-- जे प्रेमाच आहे, जे प्रेमाचे आहेत ते प्राणपणाने सांभाळा.
नाही तर पश्याताप...
 
आपली संस्कृति म्हनुनच सांगते की माणसाने नेहमीच
एक वचनी
एक बाणी आणि
एक पत्नी रहावे
नाहीतर बंधनात नाही राहिले  तर ती बंधनेच आपल्याला बंदी करतात तर संयमने बंधनात राहून त्याना बांधावी लागतात. मग बंधनाला बांधने चांगले की बंधनाने बांधलेले चांगले याचा विचार ज्याचा त्याचा त्यानेच करावा.