Thursday, August 19, 2010

शोध....

एक तुझ्यासाठी… एक माझ्यासाठी… !!

एक तुझ्यासाठी… एक माझ्यासाठी… !!

एक तुझ्यासाठी… एक माझ्यासाठी… !!
सुखाचं ऊन दु:खाची सावली,
जशी तु नी तुझी ’ती’ अबोली.
एक तुझ्यासाठी… एक माझ्यासाठी… !!
फुल नी त्याचा गंध,
जणु तुझ्या मनातले माझे रेशीमबंध.
एक तुझ्यासाठी… एक माझ्यासाठी… !!
स्वप्नांत हरवलेली पाऊले अन तुझं स्वप्नांतलं गाव,
तुझ्या आठवणींच्या किना-यावर एक वाट चुकलेली नाव.
एक तुझ्यासाठी… एक माझ्यासाठी… !!
को-या कागदावर माझ्या शब्दांचा थवा,
माझ्याच कवीतेचा तु उलगडलेला अर्थ नवा.
एक तुझ्यासाठी… एक माझ्यासाठी… !!
’तु’झ्या शिवाय कितीसा उरणारा ’मी’,
आणी तु.
एक तुझ्यासाठी… एक माझ्यासाठी… !!

 

थोडा वेळ दे…

थोडा वेळ दे…
अर्थ भरपुर आहेत,
शब्द शोधतोय,
थोडा वेळ दे…
तुझ्याबद्दल लिहायला.
रेघोटे ओढले आहेत,
त्यावर तुझ्या आपुलकीचा ओलावा.
थोडा वेळ दे…
चित्र हे सुकायला.
भाळलो मी असा,
पण तुझ्या बाह्यरुपावर नव्हे.
थोडा वेळ दे…
तुझं अंतरंग उलगडायला.
रंग नको ठरवु गुलाबाचा,
आत्ताच तर नाते जोडले आहे.
थोडा वेळ दे…
कळीला या उमलायला.
म्हणुन तर म्हणालो,
अर्थ भरपुर आहेत, शब्द शोधतोय,
थोडा वेळ दे…
तुझ्याबद्दल लिहायला.

तिला कविता आवडत नाही…

कट्ट्यावर गप्पा मारताना सहज विषय निघाला की माझ्या (होणार्‍या) बायकोचं शिक्षण इंग्रजी मिडियमचं, म्हणुन कट्ट्यावरच्या लोकांनी माझी मस्त खेचली ! त्यातुन थोडंसं लिहलं….
(सौमीत्र यांची माफी मागुन….)
तिला कविता आवडत नाही, त्याला कविता सुचते,
शब्द दाटुन आल्यावर ती त्याच्या तावडीत सापडते.
मी तिला आवडतो, पण कविता आवडत नाही,
असलं तुझं गणित खरंच मला कळत नाही.
कविता म्हणजे शद्ब, कविता म्हणजे व्यर्थ,
कविता म्हणजे हळव्या भावना, कविता म्हणजे हळवेच अर्थ.
कविता डोके खराब करते, कविता वैतागवाडी,
कविता म्हणजे झुळुक, कविता म्हणजे भिजलेली झाडी.
कविता म्हणजे रटाळलेली वाक्ये, कविता म्हणजे शिक्षा उगाच,
कविता मध्ये रमुन, मन जाउन बसतं स्वप्नांत.
दर वेळेस कविता करतो, दर वेळेस असं होतं,
कवितेवरुन भाडंण होऊन, लोकांन मधे हसं होतं.
कविता आवडत नसली तरी तो तिला आवडतो,
कवितेसकट आवडावा म्हणुन तो ही झगडतो.
हसुन मग ती येते, भिजत राहते शब्दांत.
त्याच तिचं भांडण असं ओल्यचिंब प्रेमात.

तु म्हणजे........

तु म्हणजे एक स्वप्न...,
भल्या पहाटे पडणारे,
तरीही खोटे ठरणारे........

तु म्हणजे एक स्वप्न...,
मनात दडुन ठेवलेले,
कितीही भासविले तरीही, डोळ्यातुन ओघळारे

तु म्हणजे एक स्वप्न...,
श्वासाश्वासात भिनलेले,
तरिही दुर दुर असणारे...

तु म्हणजे एक स्वप्न...,
तुझ्या आठवणीत जगणारे,
मित्र जवळ असुनही, तुलाच शोधत फ़िरणारे

तु म्हणजे एक स्वप्न...,
दिवसा सुद्धा छळणारे,
ती सोबत नसतानाही, असल्याचे भासविणारे

तु म्हणजे एक स्वप्न...,
आठवणींचा कोंदवाडा करणारे,
अनेकदा सावरले तरीही, पुन्हा सर्व पसरणारे

तु म्हणजे एक स्वप्न...,
माझे कधिही झालेले,
तु दुर असलीस तरीही, तुझ्या सुखासाठी तळमळणारे

तु म्हणजे एक स्वप्न...,
तुझ्या विरहात एकटेच जगणारे,
तु जिंकावीस म्हणुन, कितेकदा स्वत:लाच हरविणारे

तु म्हणजे एक स्वप्न...,
येण्याची तुझ्या, त्याच वळणावर वाट पाहणारे,
प्रत्येक वसंतात झडुनही, पालवीची आस धरणारे

तु म्हणजे एक स्वप्न...,
शब्दा शब्दात विणलेले,
मला मात्र नव्या कवितेला वाव देणारे