कट्ट्यावर गप्पा मारताना सहज विषय निघाला की माझ्या (होणार्या) बायकोचं शिक्षण इंग्रजी मिडियमचं, म्हणुन कट्ट्यावरच्या लोकांनी माझी मस्त खेचली ! त्यातुन थोडंसं लिहलं….
(सौमीत्र यांची माफी मागुन….)
तिला कविता आवडत नाही, त्याला कविता सुचते,
शब्द दाटुन आल्यावर ती त्याच्या तावडीत सापडते.
मी तिला आवडतो, पण कविता आवडत नाही,
असलं तुझं गणित खरंच मला कळत नाही.
कविता म्हणजे शद्ब, कविता म्हणजे व्यर्थ,
कविता म्हणजे हळव्या भावना, कविता म्हणजे हळवेच अर्थ.
कविता डोके खराब करते, कविता वैतागवाडी,
कविता म्हणजे झुळुक, कविता म्हणजे भिजलेली झाडी.
कविता म्हणजे रटाळलेली वाक्ये, कविता म्हणजे शिक्षा उगाच,
कविता मध्ये रमुन, मन जाउन बसतं स्वप्नांत.
दर वेळेस कविता करतो, दर वेळेस असं होतं,
कवितेवरुन भाडंण होऊन, लोकांन मधे हसं होतं.
कविता आवडत नसली तरी तो तिला आवडतो,
कवितेसकट आवडावा म्हणुन तो ही झगडतो.
हसुन मग ती येते, भिजत राहते शब्दांत.
त्याच तिचं भांडण असं ओल्यचिंब प्रेमात.

No comments:
Post a Comment